no images were found
न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे पदार्पण
कोल्हापूर : न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीने (एनएसटी) रिषीहूड युनिव्हर्सिटीसोबत पहिला ऑन-कॅम्पस अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम यशस्वीपणे सुरु केल्यानंतर आता पुण्यामध्ये अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीसोबत हातमिळवणी केली आहे. या विशेष भागीदारीमुळे कम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील भारतातील पहिला उद्योगन्मुख, ग्लोबल बीटेक डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध करवून दिला जात आहे. भारतातील सर्व भागांमधून एनएसटीला विक्रमी प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हे पुढचे पाऊल उचलले गेले आहे. या नवीन भागीदारीमुळे दक्षिण व पश्चिम भारतातील विद्यार्थ्यांना भारतातील सर्वोत्तम तंत्रज्ञान शिक्षणाचा खूप सहजपणे लाभ घेता येईल.
हा चार वर्षांचा रेसिडेन्शियल अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची तंत्रज्ञान उच्च शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची वचनबद्धता दर्शवतो. त्यासाठी एनएसटी भविष्यातील टेक लीडर्सना विकसित करण्यासाठी उद्योगक्षेत्राशी संबंधित प्रगत अभ्यासक्रम प्रस्तुत करते.
सर्वोत्तम आधुनिक टेक्नॉलॉजिकल नैपुण्यांना एकत्र करून एनएसटी व एडीवायपीयुच्या सीएस आणि एआयमधील बीटेक प्रोग्राम करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योगशीलतेचा विकास घडवून आणणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. या प्रोग्रामला युजीसी व एआयसीटीईने मान्यता दिली आहे, त्यामुळे यामध्ये उच्च गुणवत्तापूर्ण, भविष्यासाठी सज्ज शिक्षण मिळेल हे नक्की.
न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे सह-संस्थापक श्री सिद्धार्थ महेश्वरी म्हणाले, “एनएसटी आणि रिषीहूड युनिव्हर्सिटी यांच्यातील भागीदारीला मिळत असलेल्या यशामुळे आम्हाला मध्य भारतामध्ये विस्तार करण्याची प्रेरणा मिळाली. भविष्यातील टेक लीडर्सना विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही एडीवायपीयुसोबत हातमिळवणी केली आहे. प्रत्यक्ष जीवनातील आव्हाने दूर करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना आत्मसात करता यावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एनएसटीच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचने पहिल्याच वर्षी जागतिक मान्यता मिळवून मोठा टप्पा गाठला आहे.”
श्री महेश्वरी पुढे म्हणाले, “जगभरातील युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठीची सर्वात प्रतिष्ठित कोडिंग स्पर्धा आयसीपीसी रिजनल्ससाठी आमचे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षीची विद्यार्थिनी मेहकने गूगल समर ऑफ कोड २०२४मार्फत १.२५ लाख रुपयांची इंटर्नशिप मिळवली आहे. ७३ देशांमधून निवडल्या गेलेल्या १२२० विद्यार्थ्यांमध्ये मेहकला स्थान मिळाले आहे. एनएसटी विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि गुणवत्ता यांचे हे एक उदाहरण आहे.”
हा अभ्यासक्रम उद्योगक्षेत्राला अनुरूप असून एमआयटी व स्टॅनफोर्डसारख्या नामांकित संस्थांमधील शिक्षकांनी तसेच आघाडीच्या MAANG कंपन्यांमधील अनुभवी प्रोफेशनल्सनी तयार केला आहे. अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम अशा व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे जे समीक्षात्मक विचार करतात, किचकट समस्यांचे निवारण करतात आणि वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या वातावरणात उत्कर्ष साधतात व तंत्रज्ञान उद्योगक्षेत्रात यश संपादन करतात.
अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट डॉ. अजिंक्य डीवाय पाटील यांनी सांगितले, “न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीसोबत आमची भागीदारी नावीन्याला प्रोत्साहन देण्यासाठी व तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. नैपुण्ये एकत्र करून त्यांच्या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी व संपूर्ण इकोसिस्टममधील हितधारकांना फायदा होईल असे सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”