Home सामाजिक जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

18 second read
0
0
25

no images were found

जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

 

        कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे 13 बंधारे पाण्याखाली आहेत.

 आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 4 टीएमसी, तुळशी 1.80 टीएमसी, वारणा 17.46 टीएमसी, दूधगंगा 9.25 टीएमसी, कासारी 1.32 टीएमसी, कडवी 1.75 टीएमसी, कुंभी 1.14 टीएमसी, पाटगाव 2.43 टीएमसी, चिकोत्रा 0.54 टीएमसी, चित्री 1.15 टीएमसी, जंगमहट्टी 1.02 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.02 टीएमसी, सर्फनाला 0.28 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.4 फूट, सुर्वे 19.8 फूट, रुई 44.6 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 24.6 फूट, राजापूर 14 फूट तर नजीकच्या सांगली  7.6 फूट व अंकली 8.4 फूट अशी आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…