no images were found
मॅटर ची ३.५ कोटी डॉलरची निधी उभारणी
कोल्हापूर : भारताला ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने नेण्यासाठी वचनबद्ध असलेल्या नाविन्यपूर्ण ईव्ही तंत्रज्ञान आणि ऊर्जा उपकरणे निर्मितीतील कंपनी मॅटरने सिरीज बी फंडींग फेरीत पहिल्या टप्प्यात ३.५ कोटी डॉलरचा निधी मिळवल्याचे आज जाहीर केले. या गुंतवणूक फेरीचे नेतृत्व अमेरिकेतील जागतिक समस्या सल्लागार कंपनी हेलेनाने केले असून, तिच्या उद्यम भांडवल शाखेने ही गुंतवणूक केली आहे. या फेरीतील इतर उल्लेखनीय गुंतवणूकदारांमध्ये कॅपिटल टू बी, जपान एअरलाइन्स अँड ट्रान्सलिंक इनोव्हेशन फंड, साद बहवान इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी (एसबी इन्व्हेस्ट) इतर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि कौटुंबिक गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
शाश्वत, उच्च-कार्यक्षम गतिशीलता उपायांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन, पुरवठा साखळी, मार्केटिंग आणि रिटेल विक्रीचे प्रमाण वाढवण्याच्या मॅटरच्या प्रयत्नांना हे भांडवल गती देईल.
इलेक्ट्रिक वाहनांमधील नावीन्यपूर्ण संकल्पनांवर भर देणाऱ्या मॅटरला जागतिक संस्थांकडून मिळणारा निधी तिच्या गतिशीलतेचे सक्षमीकरण आणि स्वच्छ भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनाप्रती असलेल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. यावेळी मॅटर ग्रुप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहल लालभाई म्हणाले, “आम्ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित सुलभ, विश्वासार्ह आणि उच्च-कार्यक्षमतेची उत्पादने तयार करण्यासाठी समर्पित आहोत. मॅटर इलेक्ट्रिक मोटारसायकलींसह, आम्ही जगातील सर्वात मोठ्या दुचाकींच्या बाजारपेठेत परिवर्तन घडवून गतिशीलतेचे नवे नियम लिहिण्यास सज्ज आहोत “.