Home मनोरंजन ‘वंशज’ मध्ये मोना वासू यांची एंट्री

‘वंशज’ मध्ये मोना वासू यांची एंट्री

4 second read
0
0
72

no images were found

‘वंशज’ मध्ये मोना वासू यांची एंट्री

सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेत कुटुंबातील पारंपरिक व्यवसाय वारसा घेण्याबाबत  संघर्षाचा विषय मांडण्यात आला आहे. या वारसा हक्काच्या पारंपरिक पद्धतीमुळे युविका (अंजली तत्रारी) आणि दिग्विजय महाजन उर्फ डीजे (माहीर पांधी) या भावंडांमध्ये वाद दिसून येतोय. महाजन ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकी हक्काचा हा वाद आहे. पुढील भागांत, दीर्घ संघर्षानंतर युविका अखेर महाजन कुटुंबाच्या व्यवसायाचे नेतृत्व स्वीकारते. पुढे ती व्यवसाय वाढवते, अनेक करार करते. याद्वारे ती महाजन कुटुंबाचा अनेक वर्षांपासूनचा स्पर्धक तलवार कुटुंबाच्या व्यवसायालाही मागे टाकते.

 मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मोना वासू या शालिनी तलवारच्या भूमिकेत दिसतील. तलवार कुटुंबातील अत्यंत सुंदर, बुद्धिवान स्त्री.. महाजन कुटुंबाने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केल्याची अत्यंत दृढ भावना तिच्या पात्रात खोलवर रुजली आहे. महाजन कुटुंबाबद्दलचा तिरस्कार शालिनीच्या आत रुजला असल्याने त्यांचा बदला घेण्याचा निश्चयच तिने केलेला आहे. ‘वंशज’ मालिकेत पुढील भागात महाजन कुटुंबाला जबरदस्त धक्का देण्याची तयारी तलवार कुटुंबाने केली असल्याने या कथानकात अनेक वळणं येणार आहेत.

शालिनी तलवारचे पात्र साकारणाऱ्या मोना वासू म्हणतात,“वंशजमधील हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अत्यंत भेदक  आणि शक्तिशाली असे हे पात्र कोणतीही परिस्थिती अत्यंत शिताफीने हाताळू शकते. शालिनीच्या प्रवेशामुळे दोन्ही कुटुंबादरम्यानचे शत्रुत्व आणखी वाढते. ती शक्तिशाली, आत्मविश्वासू आणि यशस्वी आहे, पण तिच्या हृदयात तिने खूप मोठी रहस्ये दडपून ठेवली आहेत, जी तिच्यासाठीही खूप त्रासदायक आहेत. ही रहस्ये बाहेर आली तर तिने अत्यंत काळजीपूर्वक घडवलेले जीवन पूर्णपणे उध्वस्त होईल, तिच्या मुलाकडून मिळणारे प्रेम, आदर नष्ट होईल, अशी भीती तिला वाटत असते. या पात्राची बुद्धिमत्ता, उत्साह आणि आयुष्यातील जिद्द साकारण्यासाठी मी उत्सुक आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …