राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताहांतर्गत शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रम कोल्हापूर – राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, कोल्हापूर चॅप्टर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र तसेच कृषी रसायने व किड व्यवस्थापन अधिविभागांमार्फत राष्ट्रीय विज्ञान सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन, विख्यात संशोधकाची व्याख्याने आयोजित करण्यात आली. यावेळी विविध अधिविभागांमार्फत “ग्लोबल सायन्स …