no images were found
विद्या प्रबोधिनीच्या 7 विद्यार्थ्यांचे बँकिंग परीक्षेत उल्लेखनीय यश
कोल्हापूर: नुकत्याच जाहीर झालेल्या एसबीआय कनिष्ठ सहाय्यक परीक्षेतील यशवंतांचा सत्कार समारंभ विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या तब्बल सात विद्यार्थ्यांनी एकाच वेळी या परीक्षेतून यश संपादन केले आहे. पूर्वा नगारे, जय गौड, विशाल जाधव, गौतमी मोरबाळे, सुशांत चौगुले, धैर्यशील गावडे व विलास गुरव या यशवंतांना संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विवाहित असल्याने स्पर्धा परीक्षांतून यश मिळणे अवघड जाते हा समाज खोटा ठरवत सौ पूर्वा नगारे शिंदे यांनी यश संपादन केले आहे. बँकिंग परीक्षा पास होण्यासाठी कोणतेही रॉकेट सायन्स लागत नाही मात्र अपयशीची भीती दूर सारून अभ्यासातील सातत्य कायम ठेवावे लागते असे त्या याप्रसंगी म्हणाल्या. इतर यशवंतांनी आपल्या मनोगताच्या वेळी स्वतःवर विश्वास ठेवणे, इंग्रजीची अनावश्यक भीती दूर सारणे, अभ्यासातील प्रामाणिकपणा, भरपूर सराव यासह योग्य मार्गदर्शन यांची गरज असल्याचे नमूद केले. तब्बल एकोणीस परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर यशस्वी ठरलेल्या सुशांत चौगुले यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये जिद्दीला पर्याय नसल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी विद्या प्रबोधिनी बँकिंग विभागाच्या प्रमुख सौ वृंदा सलगर, मार्गदर्शक श्री हनुमंत गणगे, सौ संध्या गोंधळी व सौ प्राजक्ता पाटील उपस्थित होते.