no images were found
न्यू पॉलिटेक्निकचा क्रिडामहोत्सव ‘न्यूक्लिअस २०२३’ उत्साहात सुरू
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक आणि न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित ‘न्यूक्लियस 2023’ या वार्षिक क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय एअर रायफल शुटर व पदकविजेत्या राधिका हवालदार-बराले यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार अध्यक्षस्थानी होते. न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार, डॉ. सचिन पिशवीकर, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. सुहास देशमुख, न्यू पॉलिटेक्निकमधील विभाग प्रमुख, सर्व स्टाफ, खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी राधिका बराले यांचे स्वागत व सत्कार केला. यानंतर, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हवेत फुगे सोडून क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना राधिका बराले म्हणाल्या की ‘खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो. आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगास तोंड देण्याची व त्यातून मार्ग काढण्याची हिम्मत खेळच देतो. अर्थात, खेळाडू म्हणून स्वतःला घडवताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मला एका एनसीसी कॅम्पमध्ये रायफल शुटींगची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी मागे वळून पाहीले नाही. तुम्हीही एखादा आवडीचा खेळ जोपासा.’
शेवटी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही राधिका हवालदार-बराले यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले.