विद्यापीठाच्या तीन स्वायत्त महाविद्यालयांना ‘अधिकारप्रदत्त’ दर्जा विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करता येणार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या तीन स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करता येऊ शकणार आहे. विद्यापरिषदेच्या शिफारशींवरून व्यवस्थापन परिषदेने नुकताच तीन स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला. यामध्ये दत्ताजीराव कदम टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरींग …