no images were found
डी. वाय. पाटील इंजिनिअरींगच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या १०० हुन अधिक विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
कसबा बावडा: येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या सिव्हील विभागाच्या १०० हुन अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ लाखापासून ७ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील संदेश विलास गणेशाचार्य याची उपसंचालक भूमिअभिलेख पुणे येथे भूकरमापक म्हणून निवड झाली आहे. तर पार्थ पाटील यांची युनिटेक काँक्रीट मध्ये ६.५ लाख पॅकेज तर श्रेया सुनील देसाई हिला एल. अँड टी. कन्स्ट्रक्शनमध्ये ६ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.अमन पटवेकर , बसवराज गुंडद , मोहम्मद मोमीन , परमेश्वर कोळेकर , प्रथमेश पवार , ऋत्विक पाटील , सौरभ लकडे , सौरभ पाटील , सिद्देश लोहार , सुमित कांबळे , तुषार राजमाने , यश पाटील , यश कोकणे , धनंजय पाटील , हरी मेटे , जय थिटे ,प्रणव भुते , पुष्कर चव्हाण ,संदेश गावरे , संग्रामसिंह रोडे पाटील, वैभव कुंभार आणि योगेश पाटील या सर्व विद्यार्थ्यांची ‘पिनक्लिक’ कंपनीने सहाय्यक मालमत्ता सल्लागार म्हणून निवड केली आहे. ‘पिनक्लिक’ ही ख्यातनाम मालमत्ता सल्लागार कंपनी असून पुणे, मुंबई, बेंगळूर व गुरगाव आदी महानगरमध्ये कंपनीची कार्यालये आहेत. निवड झालेल्या विद्यार्थांना ४.८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे.
यावर्षी सिव्हिल इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्याना बायजूस (७ लाख), आरडीसी कॉन्क्रीट, युनिटेक कॉन्क्रीट (६.५ लाख), शोभा डेव्हलपर्स (५ लाख), क्यू स्पायडर (४ लाख), डी एक्स सी टेक्नॉलॉजी (४.२ लाख), Chegg(३ लाख), एक्सेलआर (३ लाख), टेक्नॉलॉजी(३ लाख), अल्ट्राटेक सिमेंट (२.२५) लाख आदी नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या नोकरीची संधी मिळाली आहे. यापुढेही अशा प्रकारचे कॅम्पस प्लेसमेंट आयोजित केले जाणार असून त्यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने प्रशिक्षण दिले जाते.
निवड झालेल्या विद्यार्थ्याना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग मकरंद काईंगडे, डॉ. के. एम. माने, प्रा.अजीम सुतार आणि प्रा. अमित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ.एल. व्ही. मालदे यानी अभिनंदन केले आहे.