no images were found
लिंगायत समाज रुद्रभूमीच्या पूरसंरक्षक भिंतीसाठी निधी देवू : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : लोकराजा राजर्षि शाहू महाराज कोल्हापूरचे भाग्यविधाते आहेत. त्यांचा वारसा कोल्हापूरकराना लाभला हे आपल्या सर्वांचे भाग्य समजतो. राजर्षि शाहू महाराजांनाची कृपादृष्टी लाभलेला कोल्हापूर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे. व्यापार, क्रीडा, कला, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील राजर्षि शाहू महाराजांचे काम अलौकिक आहे. जातीभेद दूर करत कोल्हापुरातील सर्वच समाजांना एकजूटीची शिकवण देत समाज उन्नतीचे कार्य केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली समतेची शिकवण सर्वांनीच अंगिकारावी हीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली आहे. महाराजांनी अठरा पगड जाती, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य केले. या समाजाच्या समस्या सोडविण्याची आपली जबाबदारी असून, लिंगायत समाज रुद्रभूमीच्या पूरसंरक्षक भिंतीसाठी निधी देवू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने रुद्र्भूमी येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, स्वाभिमानी राजर्षि शाहू महाराजांनी करवीरवासियांना स्वाभिमानाने जगायला शिकविले. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने कोल्हापूर जिल्हा सुजलामसुफलाम झाला. कोल्हापुरातील प्रत्येक समाजास राजर्षी शाहू महाराजांनी प्रगतीचा मार्ग दाखविला. लिंगायत समाजावरही त्याच पद्धतीने महाराजांची कृपादृष्टी झाली आहे. लिंगायत समाजाचे गेल्या काही वर्षातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. रुद्र्भूमीची सुधारणा होण्यासाठी यापूर्वी काही प्रमाणात निधी दिला आहे. सद्यस्थिती पावसाळ्याचे दिवस असून, रुद्र्भूमीत पुराचे पाणी येथे शिरत असल्याने अनेक समस्यांना समाजबांधवांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी पूरसंरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राधान्याने रुद्र्भूमी येथे पूरसरंक्षक भिंत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करू. यासह रुद्रभूमीच्या सुधारणेबाबतचा प्रस्ताव तात्काळ महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याच्या सूचना देवून त्यासही निधी देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, दैव गवळी समाजाचे अध्यक्ष दिलीप गवळी, लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, लिंगायत समाज सचिव राजू वाली, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाज अध्यक्ष सुहास भेंडे, उपाध्यक्ष राजेंद्र वाली, सचिव अॅड.सतीश खोतलांडे, वीरशैव अक्कमहादेवी महिला मंडळ अध्यक्षा सौ.माधवी बोधले, उपाध्यक्षा सौ.सुजाता विभूते, सचिव सौ.संगीता करंबळी, गुरु स्वामी, राहुल नष्टे, केतन तवटे, अविनाश नासिपुडे, सौ. स्मिता हळदे, सौ. मंदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.