no images were found
नागपूरनंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा; आमदार सतेज पाटील करणार नियोजन
कोल्हापूर : आता राज्यातील विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांचे पडगम वाजण्यास सुरूवात झाली आहे.त्यानुसार राजकीय पक्ष सभा घेताना दिसत आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांविरोधात राण उठवण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल रोजी पार पडली होती. यानंतर दुसरी सभा 16 एप्रिल रोजी नागपूरमध्ये होत असून त्यानंतर 28 एप्रिल रोजी कोल्हापुरात होईल.
दरम्यान, कोल्हापुरात होत असलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची तयारी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर असेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचण्यापूर्वी तयारीसाठी पहिली सभा कोल्हापुरात पार पडली होती. यात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचार तसेच सभेच्या नियोजनाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांनीच पार पाडली होती. तर पश्चिम महाराष्ट्रातील वज्रमुठ सभांना कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे फुटलेले आमदार आणि दोन्ही खासदार याच्या विरोधात काय भूमिका घेतात आता हे पाहावं लागणार आहे.