Home राजकीय ठाकरे गटाकडून आंदोलन; चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

ठाकरे गटाकडून आंदोलन; चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

0 second read
0
0
26

no images were found

ठाकरे गटाकडून आंदोलन; चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

कोल्हापूर: चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. अयोध्येतील बाबरी मशीद ढाचा पाडण्याबाबत वादग्रस्त विधान करणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.मंत्री पाटील यांनी हिंदूंची माफी मागणी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

कुठेही नाक खूपसून आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्याचा पाटील यांचा जुना धंदा असल्याचा हल्लाबोल जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, रवी इंगवले यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे.नेते आशिष शेलार यांनी ते वक्तव्य टाळता आले असते, असे म्हटले आहे.उद्धव ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…