ऐश्वर्या खरे साकारणार 6 वर्षांच्या मुलीच्या आईची भूमिका झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ गेली दोन वर्षे आपली रोचक कथानक आणि लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) आणि रिषी (रोहित सुचांति) च्या आयुष्यातील चढउतारांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हल्लीच्या एपिसोड्समध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कशाप्रकारे गाडीने प्रवास करत असताना लक्ष्मीची गाडी दरीत कोसळते आणि गाडीचा विस्फोट होतो आणि त्यात ती मृत झाली आहे असे मानले जाते. लक्ष्मीच्या मृत्यूच्या बातमीने रिषी अक्षरशः उध्वस्त होतो. आता …