शिवतीर्थवर दसरा मेळावा होणार का? हायकोर्टात आज सुनावणी मुंबई : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठीच्या परवानगीचा वाद आता मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून शिवसेना व शिंदे या दोन्ही गटांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठीची परवानगी नाकारली होती. यावर आज सुनावणी होणार आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने परवानगी मागितली होती तसेच शिंदे गटानेही शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी …