आंदोलकांनी चंद्रकांत पाटलांना औरंगाबादमध्ये काळे झेंडे दाखवले भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. यासंदर्भात औरंगाबादमधील अनेक संघटना चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात आंदोलन उभारत आहेत. औरंगाबादमधील गणपती संस्थानमध्ये दर्शनासाठी गेलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना अखिल भारतीय महात्मा फुले संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान काळे झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. …