Home राजकीय आव्हानाची भाषा करत आगीशी खेळू नका; मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला खडसावलं

आव्हानाची भाषा करत आगीशी खेळू नका; मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला खडसावलं

2 second read
0
0
184

no images were found

आव्हानाची भाषा करत आगीशी खेळू नका; मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला खडसावलं

मुंबई :  कर्नाटकचे शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केल्यानंतर आता राज्यात राजकीय वादंग पेटलेलं आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला सीमावादावरून घेरलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रद्वेषी भूमिकेचा निषेध करत मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
सीमाप्रश्नावर महाराष्ट्रानं नेहमीच संयमाची भूमिका घेतलेली आहे. परंतु कर्नाटक सरकार सातत्यानं सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार असल्यानं त्यांनी आम्हाला आव्हानाची भाषा करून आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. मुंबई कुणाच्या बापाची नाही तर मराठी माणसाची आहे. जेव्हा-जेव्हा शहरावर संकटं आली तेव्हा मुंबईकरांनी एकत्र येऊन लढा दिला असून त्यामुळं कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…