
no images were found
मराठी पत्रकार दिनानिमित्त विद्यापीठात कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठी पत्रकारिता दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागात ‘पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल संघर्ष ः माध्यमांची भूमिका’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळचे आयोजन केले आहे. विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृहात दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील अध्यक्षस्थानी असतील.
कार्यशाळेत ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, श्रीराम पवार आणि इतिहास विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. एम. पी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर प्रेस क्लब, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अॅन्ड एटिडर्स असोशिएशन, ऐतवडे येथील वारणा महाविद्यालय, कराड येथील शिक्षण महर्षि बापूजी साळुंखे महाविद्यालय तसेच तिटवे येथील शहीर वीरपत्नी लक्ष्मीबाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी, पत्रकार आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागप्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी केले आहे.