Home शासकीय निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी

15 second read
0
0
34

no images were found

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी

 नगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी मतदान करण्याचेही केले आवाहन, नगरपालिका मतदान तयारी अंतिम टप्प्यात

 कोल्हापूर,  : शेवटच्या टप्प्यातील आदर्श आचारसंहितेचे पालन, मतदान, मतमोजीणी अशा सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुयोग्य पध्दतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.

      आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाश योजनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने लाईट व्यवस्था सुरळीत राहील याची विशेष दक्षता घ्यावी. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास बॅटरी उपलब्ध ठेवावी, तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या आढावा बैठकीत सर्व तहसीलदारांना दिल्या.

      बैठकीत मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा, आदर्श व महिला मतदान केंद्रांची व्यवस्था, मतदान साहित्याचे वितरण, केंद्रांवर जाण्याचे नियोजन, मतदान दिवशी रिपोर्टिंगची वेळ, तसेच मत मोजणीसंबंधीची माहिती व आकडेवारी वेळेवर  देण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. इव्हीएम मशिन्समध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तात्काळ दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू ठेवावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी आवाहन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनीही जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

      मतदान व मतमोजणीसंबंधी योग्य माहिती सर्व मीडियाला वेळेत उपलब्ध करून द्यावी. तसेच  EVM तयारीसंदर्भात झालेले काम, मतदान संपल्यानंतर EVM व साहित्य strong room मध्ये सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था, मतमोजणीसाठी कर्मचारी नियुक्ती व प्रशिक्षण, तसेच निवडणुकीशी संबंधित न्यायालयीन अपील याबाबतही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला.

       या आढावा बैठकीस उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे  उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाल्याची ग्वाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…