no images were found
इंग्रजांकडून लढणे हे काय शौर्य नाही म्हणून या शौर्य दिवस कार्यक्रमाला आमचा विरोध : अजय सिंह सेंगर
मुंबई : भीमा कोरेगाव येथील १ जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला करणी सेनेनं विरोध केला आहे. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील इंग्रजांनी बांधलेल्या स्तंभाला अभिवादन घेण्याच्या कार्यक्रमावर बंदी टाकण्याची मागणी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. यासाठीची मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र करणी सेना विरोध करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
१ एक जानेवारी रोजी महाराष्ट्र करणी सेना ही कोरेगाव भीमा येथे येऊन धडकणार आहे. इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा उदो उदो होता कामा नये, अशी भूमिका सेंगर यांनी घेतली. कोरेगाव भीमाची ही लढाई जातीय लढाई नव्हती, इंग्रजांना पुण्यावर कब्जा मिळवण्याकरता एक छोटीशी चकमक झाली होती. परंतु वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आपली राजकीय चूल पेटवण्याकरता या छोट्याशा चकमकीला जातीय स्वरूप देत आहे आणि हिंदू – बुद्ध यांच्यात दरी निर्माण करत आहे, यांचा सेंगर यांनी निषेध केला. हिंदू धर्म आणि बुद्ध धर्मात कलह निर्माण करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडू असे सेंगर म्हणाले. कोरेगाव भीमा दिनाच्या खोट्या कथा सोशल मीडियावर टाकून माथे भडकवण्याचे काम सुरू आहे. इंग्रजांकडून लढणे हे काय शौर्य नाही म्हणून या शौर्य दिवस कार्यक्रमाला आमचा विरोध असेल असेही ते म्हणाले.
या छोट्याशा चकमकीमध्ये जे भारतीय इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद झाले त्यांची श्रद्धांजली सभा आम्ही घेणार आहोत. मग प्रशासनाने हे इंग्रजांकडून लढले त्यांचा उदो उदो करण्याच्या कार्यक्रमावर बंदी टाकावी असे सेंगर यांनी उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे. पुढे त्यांनी हा स्तंभ सरकारने काढून टाकावा अशी मागणी देखील केली आहे.