no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे भव्य गरबा-दांडिया उत्सव उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी वृंदावन गार्डन, हॉटेल अयोध्या, कावळा नाका, कोल्हापूर येथे भव्य गरबा-दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या संचालिका श्रीमती स्वाती निगडे व श्रीमती सविता पाटील, विकास अधिकारी व न्यू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे प्राचार्य डॉ. संजय डाभोळे तसेच न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली. रंगबिरंगी पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट, पारंपरिक संगीत आणि गरबा-दांडियाच्या तालावर विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सांस्कृतिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात हा गरबा-दांडिया उत्सव आनंदात संपन्न झाला.