Home राजकीय शौमिका महाडिकांना गोकुळमधील पराभव जिव्हारी

शौमिका महाडिकांना गोकुळमधील पराभव जिव्हारी

4 second read
0
0
7

no images were found

शौमिका महाडिकांना गोकुळमधील पराभव जिव्हारी

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर शौमिका महाडिक यांनी दसऱ्यानिमित्त समाजमाध्यमांवर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. ‘एका पराभवाने संघर्षाची धार कमी होणार नाही!’ असा निर्धार व्यक्त करत त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.

गोकुळच्या निवडणुकीत महाडिक कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शौमिका महाडिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा जवळपास शंभरहून अधिक मतांनी पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोकुळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे शौमिका महाडिक यांच्या पराभवाची विशेष चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी दसऱ्यानिमित्त समाजमाध्यमांवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

      ‘एका पराभवाने संघर्षाची धार कमी होणार नाही अन्यायाविरोधात उपसलेली तलवार म्यान होणार नाही! नव्या ताकदीने करूया संकल्प विजयाचा! सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्…