Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात ‘She Talk’ अंतर्गत महिला आरोग्य विषयक संवाद कार्यक्रम संपन्न

शिवाजी विद्यापीठात ‘She Talk’ अंतर्गत महिला आरोग्य विषयक संवाद कार्यक्रम संपन्न

6 second read
0
0
19

no images were found

शिवाजी विद्यापीठात ‘She Talk’ अंतर्गत महिला आरोग्य विषयक संवाद कार्यक्रम संपन्न
​कोल्हापूर (प्रतिनिधी ):-शिवाजी विद्यापीठातील स्वयंसिद्धा सेंटर, बेटी बचाओ अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘She Talk’ या उपक्रमांतर्गत “महिलांचे आरोग्य विषयक” विशेष संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राजर्षी शाहू सभागृह (सिनेट हॉल) येथे करण्यात आले.
​ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मा. प्रा. डॉ. प्रतिभा देसाई (समन्वयक, स्वयंसिद्धा सेंटर आणि विभाग प्रमुख, समाजशास्त्र अधिविभाग) यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महिलांच्या आरोग्याविषयीच्या जागृतीचे आणि ‘She Talk’ या उपक्रमाचे महत्त्व विशद केले.
​ कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु मा. प्रा. डॉ. ज्योती जाधव यांच्या शुभ हस्ते व उपस्थितांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू मा. प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी महिलांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देणे काळाची गरज असल्याचे सांगितले, तसेच महिला वापरत असलेल्या दैनंदिन जीवनातील काही वस्तूपैंकी ऊसापासून बनवलेला गूळ हा कसा सर्वाच्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. यांचे महत्व विशद केले.
​ या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. श्रीमती विनिता रानडे आणि समुपदेशक मा. श्रीमती उर्मिला शुभंकर यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींशी सविस्तर संवाद साधला. डॉ. रानडे यांनी दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयी व काळजी यावर मार्गदर्शन केले, तर श्रीमती शुभंकर यांनी मानसिक स्वास्थ्य व ताणतणाव व्यवस्थापनावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाच्यावेळी महिलांना व विदयार्थीनींना पडलेल्या आरोग्याविषयक समस्यांचे निराकरण करण्यात आले.
​ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. डॉ. प्रतिमा पवार (प्रभारी विभागप्रमुख, मानसशास्त्र अधिविभाग व वरिष्ठ प्राध्यापक, समाजशास्त्र अधिविभाग) या होत्या. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी मा. डॉ. सुहासिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
​ सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधक विद्यार्थिनी कु. सुप्रिया वडर हिने केले, तर उपस्थितांचे आभार राज्यशास्त्र अधिविभागाच्या सहाय्यक प्राध्यापक मा. डॉ. नेहा वाडेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी,रोंजदारी महिला कर्मचारी, संशोधक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न कोल्हापूर,(प्रतिनिध…