Home सामाजिक शाही दसरा महोत्सवाचा भाविक – नागरिकांनी आनंद घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

शाही दसरा महोत्सवाचा भाविक – नागरिकांनी आनंद घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

36 second read
0
0
15

no images were found

शाही दसरा महोत्सवाचा भाविक – नागरिकांनी आनंद घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

कोल्हापूर :  पावित्र्याचा,मांगल्याचा उत्सव म्हणजेच पर्यायाने नवरात्र महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाचा भाविक – नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी केले.

           राज्य शासनाचचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,जिल्हा प्रशासन व दसरा महोत्सव समिती कोल्हापूरच्यावतीने भवानी मंडप येथे शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून व शस्त्र पूजन करून जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

       व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर जिल्हाधिकारी अजय पवार, शिवाजी विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा.ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,मनपा उपायुक्त परितोष कंकाळ,क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख,तहसीलदार तेजस्विनी पाटील,मंदिर समिती सचिव वर्षा साळुंखे आदी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून राज्य शासनाने नवरात्र महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सव म्हणून जाहीर केले आहे. 11 ते 20 ऑक्टोबर या नवरात्र महोत्सव कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमामध्ये कोल्हापूरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवावा. तसेच यंदा दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा त्याचबरोबर दुष्काळाची जाण ठेवावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. तत्पूर्वी उदय गायकवाड यांनी या महोत्सव आयोजना पाठीमागील भूमिका विशद केली.

      या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शाहीर आझाद नाईकवाडी यांनी शाहिरी पोवाडा सादर केला तर कोल्हापूर जिल्हा दांडपट्टा – लाठी असोसिएशनचे अध्यक्ष पंडित पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली साहसी मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक खेळाडूंनी सादर केले. या प्रात्यक्षिकाला जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवर व नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात मनमुराद दाद दिली.यावेळी पोलंडहून आलेल्या युवा विद्यार्थी शिष्टमंडळ समूहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.                                                   याप्रसंगी माय भारतचे उपसंचालक राहुल डोंगरे, राष्ट्रीय सेवा आयोजनाचे संचालक डॉ.कबीर खराडे, नायब तहसीलदार नितीन धापसे-पाटील ,प्रमोद पाटील , अजेय दळवी यांच्यासह भाविक व इतर कलाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न कोल्हापूर,(प्रतिनिध…