Home Uncategorized ’हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल,  रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

’हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल,  रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

2 second read
0
0
5

no images were found

’हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल,  रविंद्र चव्हाण यांचा विश्वास : ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रात शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासातील सेवाभाव, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि सुशासनाची प्रेरणादायी गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ या पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रातील शुभारंभ मुंबईतील केसी महाविद्यालय येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पथनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांचा आणि संयोजकांचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील संघर्ष, सेवाभाव, राष्ट्रनिष्ठा आणि जनसेवेचा प्रवास पथनाट्याच्या माध्यमातून  प्रभावी पद्धतीने जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पिंपरी-चिंचवडमधील कलाकार पथनाट्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग महाराष्ट्राच्या विविध भागांत सादर करणार आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रयोग, तर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान १० पथनाट्य प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर हे पथनाट्य सादर होणार असून, नवोदित कलाकारांना या माध्यमातून जनजागृती आणि सामाजिक संदेश देण्याची संधी मिळणार आहे.

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या चरित्रातून आपल्याला सेवाभाव, सुशासन, समर्पण आणि राष्ट्रभक्तीची शिकवण मिळते. त्यांच्या जीवनातील असे प्रेरणादायी क्षण पथनाट्याच्या माध्यमातून जनमानसात रुजविण्यासाठी ‘नमो सेवा गाथा’ हा स्तुत्य उपक्रम आहे. ‘हनुमान अंश’ या नवोदित कलाकारांच्या चित्रपटाने ज्याप्रमाणे रेकॉर्ड निर्माण केले, त्याचप्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ हे पथनाट्य देखील रेकॉर्ड करेल” असा विश्वास यावेळी रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

या शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष आ. राहुल नार्वेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. अमित गोरखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना …