Home Uncategorized जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा महोत्सवाची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा महोत्सवाची बैठक संपन्न

0 second read
0
0
11

no images were found

जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा महोत्सवाची बैठक संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यास अनेक शतकांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तथापि शिक्षक / पदवीधर मतदार संघाची निवडणूक (विधान परिषद) आचार संहिता तसेच दुष्काळ सदृष्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी बैठकीत दिली . जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात दसरा महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ते म्हणाले,नवरात्र कालावधी दरम्यान कोल्हापूर शहरात अंदाजे 30 ते 40 लाख भाविक व पर्यटक भेट देत असतात. हा उत्सव कोल्हापूरच्या संस्कृती आणि परंपरांचा महोत्सव असल्याने या महोत्सवाला देश तसेच जगभर मान्यता आहे.दि 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.कोल्हापूर दसरा महोत्सव 2026 अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम,पारंपरिक वेशभूषा, हस्तकला,चित्रकला, पर्यटन, निबंध,रांगोळी स्पर्धा,नागरिकांसाठी चित्रनगरीची सफर,महिलांची बाइक रॅली त्याचबरोबर कोल्हापूरची शौर्यगाथा आदी उपक्रम सादर करण्यात येणार आहेत. या महोत्सवांतर्गत 11 ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सवाचे उद्घाटन ऐतिहासिक दसरा चौक मैदानात होणार आहे.या महोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच देशभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि हा दसरा महोत्सव जगप्रसिद्ध करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. या बैठकीसाठी मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड , पोलीस अधीक्षक निलोत्पल ,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख , करमणूक तहसीलदार श्रीमती तेजस्विनी पाटील ,प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य.अभियंता क्रांतीकुमार मिरजकर ,मंदिर समितीच्या सचिव श्रीमती वर्षा साळोखे आदी उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना …