no images were found
श्री महालक्ष्मीदेवीच्या चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता !
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ५ ऑक्टोबरपासून देवीच्या दागिन्यांची स्वच्छता चालू करण्यात आली आहे. यात देवीच्या नित्यपूजेतील चांदीच्या भांड्यांची स्वच्छता करण्यात आली. याचसमवेत चांदीची पालखी, सिंहासन, कठांजन, चौरंग, सिंह, मेघडंबरी, पंचारती, धुपारती, एकारती, तलवार, त्रिशुळ, समया प्रभावळ, अब्दागिरी, मोर्चेल, विविध आयुधे, पाट आदींचा समावेश आहे.
६ ऑक्टोबर या दिवशी देवीच्या सोन्याच्या विविध अभूषणांची स्वच्छता केली जाणार आहे. यात शिवकालीन कवड्याची माळ, १६ पदरी चंद्रहार, सोन्याची पालखी, सिंह, गदा, त्रिशुळ बोरमाळ, कवड्याची माळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल,सोन किरीट, बोरमाळ, कर्णफुले,मासोळी, चाफेकळी हार, कोल्हापुरी साज, मंगळसुत्र, लप्पा (गळ्यातील हार), पायातील तोडे, नथ, सातपदरी कंठी अशा अनेक दागिन्यांचा समावेश आहे.