no images were found
सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक
कोल्हापूर : आगामी मराठी चित्रपट **‘सोहळा’**चा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे. सैकत बागबान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
रोज ऑडिओ व्हिज्युअल्सच्या बॅनरखाली गोल्डी बहल, तसेच कॅरिऑन फिल्म्सच्या बॅनरखाली सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव आणि कविता बागबान यांनी ‘सोहळा’ची निर्मिती केली आहे.
चित्रपटात प्रवीन दलिम्बकर, देवदत्त प्रशांत गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी संजय घोडके आणि एलेसांद्रा व्हेलन मेरिडिज़ हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ट्रेलरमधून चित्रपटाची कथा, व्यक्तिरेखा आणि भावनिक विश्वाची झलक पाहायला मिळत असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘सोहळा’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह विविध ठिकाणी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरनंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.