Home Uncategorized ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा

‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा

1 second read
0
0
6

no images were found

‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा : ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुली

कोल्हापूर : भारतीय आणि जागतिक सिनेमामध्ये वंचित घटकांचे प्रतिनिधित्व, त्यांचे चित्रण तसेच मुख्य प्रवाहातील सिनेमातील त्यांचे स्थान यावर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ या विषयावर ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मास कम्युनिकेशन विभागात होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या दिवशी ज्येष्ठ संपादक व चित्रपट अभ्यासक डॉ. विजय चोरमारे ‘भारतीय चित्रपटातील वंचितांचे स्थान’ या विषयावर मार्गदर्शन करतील. वंचित घटकांचे अभ्यासक अविनाश भाले ‘LGBTQ+ चे सिनेमातील चित्रण’, तर जागतिक सिनेमाच्या अभ्यासक प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी ‘जागतिक परिदृश्यात वंचितांचा सिनेमा’ या विषयांवर विचार मांडतील.
दुसऱ्या दिवशी पुणे येथील चित्रशारदाच्या व्यवस्थापकीय संपादक अश्विनी धायगुडे-कोळेकर ‘सिनेमातील लिंगाधारित पूर्वग्रह’, तर चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया ‘वंचितांच्या चित्रपटांचे भवितव्य आणि आव्हाने’, तसेच ख्यातनाम अभिनेते व लेखक डॉ. मिलिंद शिंदे ‘वंचित घटक आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, प्रतिनिधित्व आणि वंचित घटकांच्या प्रश्नांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी मिळावी, हा कार्यशाळेचा उद्देश आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिली. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे विद्यार्थी, चित्रपट अभ्यासक, माध्यम क्षेत्रातील व्यक्ती तसेच सिनेमात रस असणाऱ्या नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बी.ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे ‘जागतिक फार्मसिस्ट दिन’ उत्साहात; राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे विजेते घोषित

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे ‘जागतिक फार्मसिस्ट दिन’ उत्साहात; राष्ट्…