Home Uncategorized प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

0 second read
0
0
7

no images were found

प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी): इंडियन प्लंबिंग असोसिएशन ही संघटना देशभरातील प्लंबिंग काम करणाऱ्या मंडळींच्या हितासाठी स्थापन झालेली संघटना आहे . प्लंबिंग क्षेत्रातील प्रश्न सोडवणे , समाजात प्लंबिंगचे महत्व रोजगाराच्या संधी , नवनवीन संकल्पना याबाबत ही संघटना कार्यरत आहे . संघटनेच्या कोल्हापूर चॅप्टर मध्ये (कोल्हापूर ,सांगली, सातारा ,रत्नागिरी , सिंधुदुर्ग ) सर्वसामान्य प्लंबिंग काम करणाऱ्यांपासून ते प्लंबिंग व्यवसायिक , दुकानदार यांचा समावेश आहे . कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत सहभाग घेणाऱ्या इच्छुकांना ऑक्टोबर महिन्यातील दि . ३ , दि . १० , दि . १७ , या प्रमुख दिवसांमध्ये *रोटरी समाज केंद्र* येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आज या प्रशिक्षणास सुरुवात झाली. यात थेरॉटिकल प्रेझेंटेशन , पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, प्रायोजक कंपन्यांकडून तांत्रिक माहिती आदी गोष्टींचा समावेश असेल. तर दि. २४ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे .हा ट्रेनिंग प्रोग्राम २ जण एकत्रितपणे करू शकतात. या ट्रेनिंग आणि परीक्षेमध्ये सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच यातील गुणवत्ता मिळवलेल्या उमेदवारांना चेन्नई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठीही पाठवले जाणार आहे.या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी नवोदिकांना उपलब्ध होऊ शकतात. *इच्छुक उमेदवारांनी मधु किरण न्यू महाद्वार रोड येथे संपर्क साधावा* यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमित सिंग अरोरा ,सचिव मनिष जैन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर संपूर्ण प्रोग्रामचे संयोजन कोल्हापूर चॅप्टरचे रवि साळुंखे , किरण जोशी, देवांग शेठ ,गिरीश कुलकर्णी, सुशांत नांगरे , शीतल पाटील यांनी केले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे ‘जागतिक फार्मसिस्ट दिन’ उत्साहात; राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे विजेते घोषित

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे ‘जागतिक फार्मसिस्ट दिन’ उत्साहात; राष्ट्…