Home Uncategorized विकसित कोल्हापूर 4२०४७’साठी राज्यपालांकडे ‘कोल्हापूर फर्स्ट’ची भूमिका

विकसित कोल्हापूर 4२०४७’साठी राज्यपालांकडे ‘कोल्हापूर फर्स्ट’ची भूमिका

19 second read
0
0
5

no images were found

विकसित कोल्हापूर 4२०४७’साठी राज्यपालांकडे ‘कोल्हापूर फर्स्ट’ची भूमिका

 कोल्हापूरच्या विकासाचा व्यापक आराखडा, रेल्वे, पर्यटन, उद्योग व पायाभूत सुविधांवर चर्चा

कोल्हापूर, : कोल्हापूरच्या सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजित विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’च्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन ‘विकसित कोल्हापूर २०४७’या विकासदृष्टीची माहिती दिली.

      यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट  व्यासपीठाच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची तसेच शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या समन्वयात्मक पाठपुराव्याची माहिती राज्यपालांना दिली.

     कोल्हापूरचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक महत्त्व जपत आधुनिक सुविधा, उद्योग, रोजगार, पर्यटन, शिक्षण, कौशल्यविकास आणि पायाभूत सुविधांनी सक्षम असे भविष्यवेधी कोल्हापूर घडविण्याचा ‘कोल्हापूर फर्स्ट’चा प्रयत्न असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

       यावेळी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती देणे, कोल्हापूर-सांगली-सातारा-कोकण पर्यटन सर्किट PRASAD योजनेअंतर्गत  विकसित करणे, कोल्हापूरला गुंतवणुकीसाठी सक्षम औद्योगिक केंद्र बनविणे, कोल्हापूर-सांगली-सातारा फाउंड्री, इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग हब विकसित करणे, शहरातील वाहतूक व रस्ते सुविधांचे आधुनिकीकरण, तसेच कोल्हापूर-सांगली-इचलकरंजी औद्योगिक व नागरी पट्ट्याचा एकात्मिक विकास आदी प्रमुख प्राधान्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

       यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे कोल्हापूरच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी विशेष फोटो फ्रेम तसेच विकासविषयक निवेदन राज्यपालांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कोल्हापूरच्या वारशाचे जतन आणि आधुनिक विकास यांचा समन्वय साधण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.‘कोल्हापूर फर्स्ट’च्या वतीने शासन, उद्योगक्षेत्र आणि समाज यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून कोल्हापूरच्या दीर्घकालीन विकासाला गती देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

     याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार तसेच मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव, डी. वाय. पाटील ग्रुप चेअरमन संजय डी. पाटील, उद्योजक नीरज झंवर, राजीव पाटील, अजय कोराने आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी कोल्हापूर,: पारंपरिक व देशी खेळांना जागति…