Home Video राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेच्या वतीने होणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यावर्षी रद्द,

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेच्या वतीने होणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यावर्षी रद्द,

6 second read
0
0
8

no images were found

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेच्या वतीने होणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यावर्षी रद्द,

बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

कोल्हापूर (प्रतिनिधी):-भागीरथी संस्थेच्या वतीने यावर्षी गडहिंग्लज मध्ये 7 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. दरवर्षी भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या गडहिंग्लज मधील स्पर्धेलाही महिलांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली होती. मात्र सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत भागीरथी संस्थेने सामाजिक भान ठेवून, गडहिंग्लज मध्ये होणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यंदा रद्द केली आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग दुष्काळामुळे चिंताग्रस्त झाला आहे. अशावेळी महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा घेणे योग्य होणार नाही, या भावनेतून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च आणि बक्षिसांची रक्कम, मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिली जाईल, अशी माहिती भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा लोकक…