Home Uncategorized विनापरवाना व्यवसायासह घरफाळा थकबाकीप्रकरणी महालक्ष्मी मनी आर्ट सील

विनापरवाना व्यवसायासह घरफाळा थकबाकीप्रकरणी महालक्ष्मी मनी आर्ट सील

14 second read
0
0
6

no images were found

विनापरवाना व्यवसायासह घरफाळा थकबाकीप्रकरणी महालक्ष्मी मनी आर्ट सील

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना न घेता तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक अर्जही दाखल न करता सुरू ठेवण्यात आलेल्या महाद्वार रोड येथील स्वरूप प्लाझामधील महालक्ष्मी मनी आर्ट या व्यवसायावर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.2 च्यावतीने कारवाई करून व्यवसाय सील केला. संबंधित व्यवसायधारकाकडे घरफाळ्याची थकबाकीही असल्याने ही कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

            महाद्वार रोड येथील स्वरूप प्लाझामध्ये संबंधित व्यवसाय विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी महापालिकेच्या परवाना विभाग तसेच अग्निशमन विभागामार्फत नियमानुसार नोटीस देण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी व्यवसाय परवाना घेतला नाही तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक अर्जही दाखल केला नाही. यासोबतच घरफाळ्याची थकबाकी असल्याने संबंधित व्यवसाय मंगळवारी सायंकाळी सील करण्यात आला. दरम्यान, पापाची तिकटी ते महाद्वार रोड या परिसरातही महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी ८ व्यवसायधारकांना विनापरवाना व्यवसायाबाबत नोटिसा देण्यात आल्या. तसेच ५ मिळकतधारकांना घरफाळा थकबाकीपोटी नोटिसा देऊन थकबाकी भरण्याबाबत समज देण्यात आली. या कारवाईदरम्यान रु. १४,७०० इतकी थकबाकी वसूल करण्यात आली. ही संयुक्त कारवाई महापालिकेच्या परवाना विभाग, घरफाळा विभाग, विभागीय कार्यालय क्र. २ छत्रपती शिवाजी मार्केट आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने केली.

            ही कारवाई उपायुक्त किरणकुमार धनवाडे व सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक संदीप भोई, उदय भोसले, शिवाजी कोकरे, वरिष्ठ कर सहायक रवी सरदेसाई, स्थानक अधिकारी कांता बांदेकर, भोलानाथ पाटणकर तसेच घरफाळा विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांनी नियमानुसार व्यवसाय परवाना घेऊनच व्यवसाय करावा तसेच घरफाळा व इतर महापालिका करांची थकबाकी वेळेत भरावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

या गांधी जयंतीनिमित्त कलाकार महात्मा गांधींच्या त्या मूल्यांबद्दल बोलतात, जी आजही त्यांना प्रेरणा देतात

या गांधी जयंतीनिमित्त कलाकार महात्मा गांधींच्या त्या मूल्यांबद्दल बोलतात, जी आजही त्यांना …