
no images were found
डीकेटीईचा स्मार्ट इरिगेशन सिस्टीम युजिंग अर्टिफिएशल इंटेलिजएन्स प्रकल्प विकसीत
इचलकरंजी(प्रतिनिधी) – येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी प्रतिक पाटील, साक्षी उगारे, मसीरा शिलेदार, शुभम बावले यांनी प्रा. शुभांगी मांजरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेतक-यांसाठी स्मार्ट इरिगेशन सिस्टीम युजिंग अर्टिफिएशल इंटेलिजएन्स हा नाविण्यपूर्ण प्रकल्प विकसीत केला आहे. हा प्रकल्प शेतक-यांना दिलासा देणारा असून यामध्ये पिकाला पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमता (एआय) चा वापर करुन मातीतील आर्द्रता निरीक्षण करणे आणि सिंचन नेटवर्कमध्ये स्वंयचलित पध्दतीने गरज असेल तेव्हा पाणी सोडणे हे शक्य झाले आहे.
भारत हा शेतीप्रधान देश आहे देशाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. पण सध्या शेती करीत असताना शेतक-यांना पाण्याच्या अभावी शेती करता येत नाही. प्रत्येक शेतक-याला शेतातील पाण्याचा अपव्यय ही एक व्यापक समस्या आहे ज्याला कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण देखरेखीची आवश्यकता आहे. सार्वजनिक आणि प्रशासकीय अनभिज्ञता हे एक प्रमुख कारण आहे. विविध सिंचन आणि निरीक्षण प्रणाली अस्तित्वात असताना मॅन्युएल नियंत्रण अनेकदा कार्यक्षमतेत अडथळा आणते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, एक नाविन्यपूर्ण उपाय आवश्यक आहे. हाच उपाय शोधण्यासाठी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी या सर्व समस्येचा विचार करुन हा प्रकल्प तयार केलेला आहे.
हा प्रकल्प आरडिनो युनो प्लॅटफार्मवर कार्यन्वित असून ही प्रणाली पाईप्समधून पाणी सोडण्याचे नियमन करते कृत्रिम बुध्दिमता (एआय) शेतातील सिंचनासाठी एक नियोजित वेळापत्रक स्थापित करते आणि त्याप्रमाणे पाणी वितरण करते या व्यतिरिक्त आयओटी आणि एआय चे एकत्रिकरण पाणी वितरणाचे रियल टाईम मॉनिटरींग करते ज्यामुळे व्यवस्थापण प्रणाली आणि अंतिम वापरकरत्यांना फायदा होतो. या नाविण्यपूर्ण पध्दतीचा उददेश शेतातील पाण्याचा अपव्यय रोखणे आणि पाणी टंचाईच्या जागतिक चिंतेला तोंड देताना संसाधनाचा प्रभावीपणे वापर सुनिश्चीत करणे हा आहे.
डीकेटीईचा हा प्रकल्प शेतक-यांचा उपयोगी असून या प्रकल्पाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्रा.डॉ. सौ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. आर.एन. पाटील यांचे विषेश सहकार्य लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थ्यांनी शेतीसाठी तयार केलेल्या कृत्रिम बुध्दीमता प्रकल्पासोबत मागदर्शक व विद्यार्थी.