Home शासकीय ‘नया साल नया जोश’ मोहिमेत कोल्हापूर पोस्ट विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये दुसरा

‘नया साल नया जोश’ मोहिमेत कोल्हापूर पोस्ट विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये दुसरा

10 second read
0
0
30

no images were found

‘नया साल नया जोश’ मोहिमेत कोल्हापूर पोस्ट विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये दुसरा

 

कोल्हापूर : ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, तसेच पोस्टाच्या ग्राहकांना आर्थिक लाभाच्या (financial Inclusion) विविध योजनांचा फायदा मिळावा या हेतू‌ने ‘नया साल नया जोश’ मोहिमेचे आयोजन मंडल कार्यालय, मुंबई यांनी केले होते. त्यामध्ये कोल्हापूर विभागाने १ लाख ४२ हजार ६९१ खाती उघडून, 202.51 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले व महाराष्ट्र सर्कल मध्ये दुसरा क्रमांक पटकावला त्यासाठी कोल्हापूर विभागाने पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र मंडल कार्यालयाकडून यशस्वितांचा सत्कार करण्यात आला.

मोहिमेत सहा उपविभागांनी उत्साहात सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. कागल उपविभागाचे डाक निरीक्षक अभिजित जाधव यांनी सर्वाधिक नेट खाती उघडून गोवा रिजनमध्ये पहिला क्रमांक मिळवला. सहा. अधिक्षक पश्चिम उपविभाग दत्ता मस्कर यांनी दुसरा तर डाक निरीक्षक गारगोटी उपविभाग योगेश्वर चीतमुगरे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. मोहिमेत इचलकरंजी, गडहिंग्लज, उत्तर उपविभाग यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

पोस्ट ऑफिस श्रेणीमध्ये प्रभाकर कांबळे, पोस्टमास्तर कोल्हापूर शहर प्रधान डाक घर (HO category) यांनी गोवा रिजनमध्ये पहिला क्रमांक मिळवला, तसेच सतीश जोशी सब पोस्टमास्तर शनिवार पेठ, रुपाली पोवार सबपोस्टमास्तर भेंडे गल्ली, (SO category) भगवान गुरव ब्रांच पोस्टमास्तर, हसूर दुमाला शाखा डाकघर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

महिला प्रधान एजंट श्रेणीमध्ये अनिता विभूते (कागल पोस्ट ऑफिस) यांनी गोवा रिजनमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तसेच राष्ट्रीय पातळीवरील मिशन क्रांती या PLI RPLI च्या स्पर्धेअंतर्गत सहा अधिक्षक पश्चिम उपविभाग दत्ता मस्कर यांनी पहिला क्रमांक मिळवला तसेच धनश्री भगवान पाटील, ब्रॅच पोस्टमास्तर, महागोंड शाखा डाकघर यांनी यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक तर्फे प्रीमियम अकाउंट, जनरल इंशुरन्स, मर्चंट onbording स्पर्धे अंतर्गत प्रेम सिंग, सहा. अधिक्षक इचलकरंजी उपविभाग, निलोफर शेख यांनी अव्वल कामगिरी बजावली. यामध्ये वि‌द्याधर सुतार पोस्टमन इचलकरंजी यांना प्रथम क्रमांक तर शिवाजी पांडुरंग कुंभार यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली

किशन कुमार शर्मा (IPOS) चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कस, रामचंद्र जायभाये (IPOS), पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, अमिताभ सिंघ, पोस्टमास्तर जनरल, मुंबई रिजन, रमेश पाटील (IPOS), डाक सेवा निदेशक, गोवा रिजन, यांच्या हस्ते सर्व यशस्वितांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी जिल्हा प्रवर अधिक्षक अर्जुन इंगळे व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक संतोष कुमार यांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles

Check Also

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये कोल्हापूर विभागातील पंधरा बाजार समित्या

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये कोल्हापूर वि…