no images were found
“‘पुष्पा’ हीच त्याची आई आहे, हे सत्य उघड झाल्यानंतर टायगरच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत,”- मुकुल हरीश
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिका भावनिक वळण घेण्यासाठी सज्ज आहे. टायगर (मुकुल हरीश) एका अशा सत्याशी सामना करतो ज्यामुळे पुष्पा (करुणा पांडे)सोबतचं त्याचं नातं पूर्णपणे बदलून जातं. पुष्पा हीच त्याची आई आहे, हे सत्य समजल्यानंतर टायगर आपल्या भूतकाळाबद्दल विचार करू लागतो आणि पुष्पाला हे सत्य आधीपासूनच माहीत होतं का, हा प्रश्न त्याला सतावू लागतो. टायगर या नव्या वास्तवाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना, या सत्याचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होईल याची चिंता पुष्पाला सतावू लागते.
आगामी भागांमध्ये, पुष्पाचा दुसरा मुलगा चिराग (नितीन बाबू) सत्याच्या अधिक जवळ पोहोचतो. डीएनए चाचणीचा तपास सुरू ठेवताना, चिरागच्या हाती असा अहवाल लागतो जो टायगर आणि पुष्पाबद्दलचं सत्य उघड करू शकतो. मात्र, अहवालात नेमकं काय आहे हे समजण्याआधीच पुष्पा तो मिळवते आणि सत्य लपवून ठेवण्याच्या आशेने तो जाळून टाकते. आता टायगरला सत्य समजलं असताना आणि चिरागही ते उलगडण्याच्या जवळ पोहोचला असताना, आपलं गुपित सुरक्षित ठेवण्यासाठी पुष्पा संघर्ष करताना दिसते.
आगामी ट्रॅकबद्दल बोलताना मुकुल हरीश यांनी सांगितले, “पुष्पा हीच त्याची आई आहे, हे सत्य समोर आल्यामुळे टायगरच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत. यामुळे त्याच्या मनात अनेक भावना आणि प्रश्न निर्माण होणार आहेत, विशेषतः हे सत्य त्याच्यापासून का लपवून ठेवण्यात आलं, याबद्दल. तो पुष्पासोबतच्या त्याच्या नात्याकडेही आता वेगळ्या नजरेने पाहू लागेल. टायगर आणि पुष्पासाठी गोष्टी आता आणखी गुंतागुंतीच्या होणार आहेत.”