no images were found
संकटकाळात आयसीआयसीआय प्रुडेन्शिcअल लाईफ इन्शुअरन्सकडून मदतीचा हात; कंपनीकडून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये प्रति वैयक्तिक दाव्यापोटी सरासरी १५ लाखांपर्यंत विमा मंजूर
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुअरन्सने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये वैयक्तित मृत्यू दाव्यांपोटी मृत व्यक्तींच्या कुटुंबांना सरासरी १५ लाखांचे वाटप केले आहे. कंपनीने या दाव्यांच्या भरपाई रकमेच्या बाबतीत सलग दुस-या वर्षी या व्यवसायातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. संकटकाळात कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या ध्येयाप्रती कंपनी यानिमित्ताने आपली कटिबद्धता दर्शवते.
विमा उद्योगातील गेल्या सहा वर्षांतील सार्वजनिक आकडेवारीनुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल इन्शुअरन्सचे सरासरी वैयक्तित मृत्यू दावा भरपाई मूल्य आता वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१ साली हे मूल्य १० लाखांवर नोंदवले गेले होते. हे मूल्य आता २०२६ साली १५ लाखांवर पोहोचले आहे. गेल्या ४-५ वर्षांत हे सरासरी दावा मूल्य १४ ते १५ लाखांच्या आसपास स्थिर झाल्याचे दिसून येते. वर्षागणिक लोकांचे उत्पन्न, कर्जे आणि कौटुंबिक जबाबदा-यांमध्ये बदल होतात, त्यामुळे आपल्या वाढत्या गरजा आणि जबाबदा-यांनुसार पॉलिसीधारकांनी आपल्या विमा संरक्षणाचा वेळोवेळी आढावा घेण्याची गरजही आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
याबाबतीत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुअरन्सचे अंडरटायटिंग एण्ड रिटेल क्लेम्स प्रमुख श्री. सारंग गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “जीवन विमा हा कठीण काळात आर्थिक सुरक्षितता देण्याच्या एका आश्वानावर आधारित आहे. आम्ही आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५ हजार १४९ कोटींचे दावे मंजूर केले आहेत. याशिवाय, कंपनीचा दावा निपटारा दर ९९.३ टक्क्यांवर नोंदवला गेला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे नोंदवल्यानंतर बिगर-तपासणी दाव्यांसाठी सरासरी केवळ १.१ दिवसांचा वेळ पुरेसा असतो. हे यश आम्ही ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबांना दिलेल्या शब्दाला बांधील असल्याचे सिद्ध करते.
आम्ही सातत्याने दाव्यांची प्रक्रिया सोपी करत आहोत. तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवत आहोत. यामुळे बाधित कुटुंबांना विनाविलंब मदत मिळते. यासोबतच, ग्राहकांनी त्यांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार आणि ध्येयांनुसार आपल्या विमा संरक्षणाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, यासाठीही आम्ही त्यांना प्रोत्साहित करत असतो.”
विशेष म्हणजे, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफने गेल्या काही वर्षआंत दावा भरपाईचे प्रमाण चांगले राखले आहे. ग्राहकांचे दावे वेळेवर पूर्ण करण्याच्या आपल्या वचनाचे पालनही केले आहे. पॉलिसीधारकांना याबाबतची माहिती किंवा मदत हवी असल्यास www.iciciprulife.com या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करता येईल.