Home Uncategorized असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात -शुक्रवार २ ऑक्टोबर पासून प्रारंभ

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात -शुक्रवार २ ऑक्टोबर पासून प्रारंभ

5 second read
0
0
9

no images were found

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात -शुक्रवार २ ऑक्टोबर पासून प्रारंभ -डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज,पॅथॉलॉजी विभागाकडून आयोजन -तीन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर होणार विचार मंथन

कोल्हापूर : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे ४७ वे वार्षिक अधिवेशन ‘मॅपकॉन २०२६’ यावर्षी कोल्हापूरमध्ये होता आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे या २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हॉटेल सयाजी येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पॅथॉलॉजी विभागाप्रमुख आणि संयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ सुचिता देशमुख, सचिव डॉ. आर. एस. पाटील व खजिनदार डॉ. आर. एम. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘नेक्सट जनरेशन पॅथॉलॉजी’ या थीमवर या निमित्ताने प्रथमच ‘हरित परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, डिजिटल पॅथॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रिसिजन मेडिसिन या भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, उपाध्यक्ष डॉ. राजीव राव, सचिव डॉ. चंद्रशेखर भाले, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत महाराष्ट्रासह देशभरातून ६०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर, संशोधक, आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

परिषदेत देश-विदेशातील नामवंत तज्ज्ञ, ख्यातनाम पॅथॉलॉजिस्ट आणि विषयतज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने व विशेष सत्रे होणार असून प्रगत निदान तंत्रे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष अनुभव, युवा पॅथॉलॉजिस्टना संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण, पुरस्कार, त्याचबरोबर पॅथॉलॉजी क्षेत्रातील सध्याची आव्हाने, बदलती मार्गदर्शक तत्त्वे आणि भविष्यातील वाटचाल यावर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे.

 पहिली हरित परिषद
‘मॅपकॉन’च्या इतिहासात प्रथमच ही परिषद ‘ग्रीन कॉन्फरन्स’ म्हणून आयोजित केली जात आहे. यामध्ये डिजिटल ॲब्स्ट्रॅक्ट बुक, ई-प्रमाणपत्रे, क्युआर कोडद्वारे नोंदणी केली जाणार आहे. प्लास्टिक बाटल्या आणि फ्लेक्स बॅनरचा वापर पूर्णपणे टाळून सीड-पेपर बॅग, ज्यूट बॅगचा वापर केला जाईल. कागद वाचवण्यासाठी डिजिटल पोस्टर सादरीकरण, प्रत्येक नोंदणीसाठी एक वृक्ष लागवड असे उपक्रम राबवले जाणार आहेत. वैद्यकीय परिषदेचा कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि भावी पिढीच्या पॅथॉलॉजिस्टमध्ये पर्यावरणपूरक वैद्यकीय प्रॅक्टिसची जाणीव निर्माण करणे हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी संयोजन समितीसह विविध समितींचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पुणे, : महाराष्ट्र विधान…