Home Video हुपरी-कोल्हापूर या मुख्य राज्य मार्गावरील रखडलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे – करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

हुपरी-कोल्हापूर या मुख्य राज्य मार्गावरील रखडलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे – करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

8 second read
0
0
9

no images were found

हुपरी-कोल्हापूर या मुख्य राज्य मार्गावरील रखडलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे – करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

 हुपरी-कोल्हापूर हा राज्य मार्ग असून हा मार्ग उचगांव, गडमुडशिंगी, कोडोलीसह कर्नाटकात जातो हा मार्ग अत्यंत वर्दळीचा मुख्य मार्ग आहे या मार्गावरून दररोज हजारो नागरीक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच छोटी मोठी वाहने, एस.टी. बसेस, मोठ मोठे कंन्टेनर मालवाहतुक वाहनासह इतर वाहनांची संख्या मोठया प्रमाणात या रस्त्यावरून ये जा करत असतात या मुख्य मार्गावरील उचगांव यादववाडी ओढयावरील पुलाचे बांधकाम मागील काही दिवसापासून अर्धवट स्थितीत बंद अवस्थेत आहे. पुलाचे काम अपुर्ण राहिल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठया प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेषत पावसाळया मध्ये ये जा करणाऱ्या वाहतुकदारांना अडचणींचा मोठा सामना करावा लागत होता. पुलाचे बांधकाम वेळेत पुर्ण होत नसल्याने मुख्य रस्त्यावरील या कामाकडे अधिकारी व ठेकेदार जाणुन बजून दुर्लक्ष करतात का ? हया पुलाजवळच लहान मुलांची मोठी शाळा असुन तेथील २० ते २५ लहान बसेस मुलांना घेवून या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. रात्रीच्या आंधारात गडमुडशिंगीहुन येणारी दोन चाकी वाहन धारक वेगाने येत असल्याने त्यांना हे वळण अचानक दिसत नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. पुलाचे उर्वरित काम कोणत्या कालावधीत पुर्ण होणार आहे. याबाबत स्पष्ट कालमर्यादा जाहिर करावी. वाहन धारकांची गैरसोय लक्षात घेवून पुलाचे काम प्राधान्याते पुर्ण करावे ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी असून काम लवकरात लवकर चालु करून ते पुर्ण करावे अन्यथा हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको करण्यात येणार होणाऱ्या परिणामास आपले खाते जबाबदार असेल.*
*या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. उपअभियंतासो, सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना देण्यात आले..*
*यावेळी राजू यादव बोलताना म्हणाले की हुपरी कोल्हापूर हा मोठ्या रहदारीचा मार्ग असून येथे दररोज लहान मोठ्या वाहनासह हजारो वाहने अवजड वाहतूक ह्या मार्गावर असून अशा मुख्य मार्गावरील ओढ्याच्या कामाला गती देऊन ते तात्काळ पूर्ण करावे अन्यथा रास्ता रोको करणार असा इशारा यावेळी देण्यात आला..*
*पोपट दांगट म्हणाले की गडमुडशिंगीहून येणारी वाहतूक ही अति वेगाने येत असल्याने पुलाच्या कामाच्या ठिकाणी असणारे वळण लक्षात येत नसल्याने तेथे वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे पुलाचे काम तातडीने करा अशी मागणी केली..*
*यावेळी शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग अमोल कोळी यांनी सध्या पुलाचे काम बंद असून ते तातडीने चालू करण्याच्या सूचना ठेकेदार ला देऊन ते पूर्ण करू असे आश्वासन शिवसेना शिष्टमंडळाला दिले..*
*यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, फेरीवले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासो नलवडे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, दिलीप देसाई, अजित चव्हाण, प्रकाश मुदुगडे, कृष्णात तुरुके,सुनील पारपाणी, बाबुराव पाटील, रामराव पाटील आदि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..*

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबरला विशेष आरोग्य तपासणी शिबिर

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबरला विशेष आरोग्य तपासणी शिबिर ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अ…