Home व्याख्यान मानसिक आरोग्य जनजागृतीवर मार्गदर्शनपर व्याख्यान

मानसिक आरोग्य जनजागृतीवर मार्गदर्शनपर व्याख्यान

1 second read
0
0
10

no images were found

मानसिक आरोग्य जनजागृतीवर मार्गदर्शनपर व्याख्यान
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय औषधसुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ‘मानसिक आरोग्य जनजागृती’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संदीप नांदोडे (MBBS, MD) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना मानसिक आरोग्याचे महत्त्व, मानसिक ताणतणावाची कारणे, त्याचे परिणाम तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सौ ए. आर. पुजारी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन व्याख्यात्या एन. एस. शेटे मॅडम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्याख्यान
Comments are closed.

Check Also

रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन सोलापूर: मध्यम क्षमतेच्या (२५…