
no images were found
जग गुंफलेले आहे तंत्रज्ञानाभोवती
डिजिटल साक्षरता किंवा संगणक साक्षरता प्रमुख गरज बनली आहे आणि आधुनिक काळातील नवीन जीवनसंबंधित कौशल्य आहे. दरवर्षी डिजिटल साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबत त्याबाबत लोकांना प्रेरित करण्यासाठी २ डिसेंबर रोजी जागतिक संगणक साक्षरता दिन साजरा केला जातो. यंदा संगणक साक्षरता दिनानिमित्त एण्ड टीव्हीवरील कलाकार ते कशाप्रकारे संगणक शिकले आणि त्यांचे सहकारी, मित्र व त्यांच्या कुटुंबांमधील लहान सदस्यांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाबाबत कशाप्रकारे अद्ययावत राहतात याबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत आयुध भानुशाली (कृष्णा, ‘दूसरी माँ), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा, ‘भाबीजी घर पर है’). आपल्या आजी-आजोबांना संगणक व तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्याबाबत सांगताना एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्ये कृष्णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्हणाला, “माझ्या आजी-आजोबांना कधी-कधी सर्व नवीन तंत्रज्ञानांना समजून घेणे, विशेषत: संगणक ऑपरेट करताना अवघड जाते. प्रगत संगणक तंत्रज्ञानाचा उगम होण्यापूर्वी माझे आजोबा सेवानिवृत्त झाले, ज्यामुळे संगणक कसे कार्य करते याबाबत त्यांना प्राथमिक गोष्टीच माहित आहेत. मी घरी असताना किंवा शूटिंग करत नसताना माझ्या आजोबांना संगणकाच्या मुलभूत गोष्टी शिकवतो आणि त्यांच्या स्मार्टफोनवर नवीन गोष्टींचा शोध घेण्यामध्ये देखील मदत करतो. आता ते त्यामध्ये प्रो बनले आहेत आणि ते व्हिडिओ पाहू शकतात, गेम्स खेळू शकतात किंवा आम्हा सर्वांना व्हिडिओ कॉल देखील करू शकतात. ते त्यांच्या वेळेचा सदुपयोग करत स्वत:चे ज्ञान वाढवतात, वाचन करतात किंवा त्यांच्या आवडीच्या विषयांबाबत अधिक माहिती मिळवतात, ज्यामुळे त्यांना कंटाळवाणे वाटत नाही. मैलो दूर असले तरी आपले कुटुंब व मित्रांशी कनेक्ट करण्याकरिता तंत्रज्ञानाचे आभार.’’
चालता-फिरता तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करण्याबाबत एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दरोगा हप्पू सिंगची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी म्हणाले, “असा एक काळ होता, जेव्हा मला संगणक व आधुनिक तंत्रज्ञानांबाबत फारसे माहित नव्हते. पण काळासह मी त्यांचे ज्ञान अवगत केले, कारण कार्यरत व कनेक्टेड राहण्यासाठी ते आवश्यक कौशल्य बनले आहे. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारणारे आसिफ शेख म्हणाले, “आधुनिक जगात माहिती तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण विचार आणि निर्णय घेणे सुलभ करते याबाबत आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. मी तंत्रज्ञान तज्ञ असण्यासोबत आधुनिक तंत्रज्ञान, अॅप्स किंवा ट्रेण्ड्सशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असलो तरी व्यक्तिश: सोशल मीडियामध्ये सक्षम झालेलो नाही. माझ्यासोबत काम करणारी आणि माझे व्यवस्थापन पाहणारी टीम असली तरी मी कधी-कधी अचानक येणारे नवीन ट्रेण्ड्स पाहून अचंबित होतो. या परिवर्तनाशी जुळवून घेणे सोपे नाही. पण सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी आणि आमचे चाहते व प्रेक्षकांशी कनेक्टेड राहण्यासाठी हे आवश्यक साधन आहे. म्हणून मला मोकळा वेळ मिळाला की मी माझ्या मुलांच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासोबत विविध कौशल्यांची माहिती मिळवतो. मी ऑनलाइन पेमेंट्स करताना किंवा फॉर्म्स भरताना माझी मुले त्वरित मदतीस धावून येतात. मला आनंद होत आहे की, आज भारतातील सर्व शाळांमध्ये संगणकाचे शिक्षण दिले जाते, ज्यामुळे जनरेशन झेडला उत्तम ज्ञान मिळत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा योग्यरित्या वापर केल्यास आपला देश अधिक प्रगत होईल.’’