Home मनोरंजन खलनायकी भूमिकेद्वारे कविता बॅनर्जीचा ‘ ‘भाग्यलक्ष्मी’ मध्ये प्रवेश!

खलनायकी भूमिकेद्वारे कविता बॅनर्जीचा ‘ ‘भाग्यलक्ष्मी’ मध्ये प्रवेश!

2 second read
0
0
112

no images were found

खलनायकी भूमिकेद्वारे कविता बॅनर्जीचा ‘ ‘भाग्यलक्ष्मी’ मध्ये प्रवेश!

प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या कलाकारांनी म्हणजेच प्रेक्षकांच्या आवडत्या #RishMi  यांची नावे आता घराघरात पोहोचली आहेत. लक्ष्मीवर (ऐश्वर्या खरे) बालंट येण्यासाठी बलविंदरच्या (अंकित भाटिया) मदतीने मलिष्काने (मीरा मिश्रा) स्वत:चेच कसे अपहरण करून घेतले, ते अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले. मालिकेच्या कथानकाला मिळणार्‍्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढत असून त्यांच्या मनोरंजनासाठी मालिकेतील सर्व कलाकारही रात्रंदिन काम करीत आहेत.

मालिकेच्या आगामी भागांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री कविता बॅनर्जी हिच्या प्रवेशानंतर प्रेक्षकांना काही नाट्यमय प्रसंग पाहयला मिळणार आहेत. ती रिषी आणि मलिष्का यांची कॉलेजमधील मैत्रीण सोनल हिची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सोनल ही मलिष्काची घनिष्ठ मैत्रीण असते आणि रिषीला मलिष्काच्या प्रेमात पाडण्यासाठी ती मलिष्काची मदत करण्यासाठी आलेली असते. खरे म्हणजे सोनल ही खूप महत्त्वाकांक्षी मुलगी असते आणि आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तिची तयारी असते. त्यासाठी आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्ती दुरावल्या, तरी तिला त्याची पर्वा नसते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…