no images were found
पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेने पूर्ण केले 500 एपिसोड!
अहिल्याबाई होळकर या महान सम्राज्ञीचा जीवनपट उलगडून दाखवणार्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक मालिकेने सुरुवातीपासूनच त्यातील वेधक कथानकाच्या बळावर लहान-थोर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कथेमधून प्रेक्षकांसमोर हे उलगडत गेले आहे की, अहिल्याबाई ही काळाच्या खूप पुढचा विचार करणारी, दूरदृष्टी असलेली आणि प्रजाहितदक्ष शासक होती. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याच्या आधाराने त्यांनी समाजातील अनिष्ट रूढींना आव्हान दिले आणि लोककल्याणाची कामे करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला- शिक्षणाचा समान हक्क असो, विधवा विवाह असो, स्त्री सक्षमीकरण असो किंवा दरबार सांभाळण्याचे काम असो, लोकांच्या अधिकाराच्या बाजूने त्या नेहमीच खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि उपेक्षितांना, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील चाली-रीतींना आव्हान देताना त्या डगमगल्या नाहीत. सर्व प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार्या या मालिकेने 500 भाग पूर्ण करण्याचा एक मोठा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्याचा आनंद साजरा करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेतील कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रेक्षकांचे आभार मानले.