
no images were found
“जीव माझा गुंतला” मालिकेत देवदत्त नागेची दमदार एंट्री !
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा मल्हार आजवर अनेक आव्हानांना सामोरे गेले. अनेक कसोट्या त्यांनी एकत्र मिळून पार केल्या. काही अडचणींमध्ये अंतराला मल्हारची साथ मिळाली तर कधी सुहासिनी तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून अंतरा आणि मल्हारवरील संकंट कमी होण्याचे नाव घेत नाही. आणि आता देखील मल्हारच्या हाताला दुखापत झाल्याने त्याची सर्जरी होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तिला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्जरी कशी निर्विघ्नपणे पार होईल हे अंतराच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हानं आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी अंतराने रेसमध्ये सहभागी होण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आणि याच रेसमध्ये आयोजक म्हणून मालिकेत नवी एंट्री होणार आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता देवदत्त नागे जीव माझा गुंतला मालिकेत तुषार देसाई हे महत्वपूर्ण पात्र साकारणार आहे. आता हे पात्र निगेटिव्ह असेल कि मल्हार अंतराला या कठीण परिस्थितून मदत करेल हे हळूहळू उलघडेल. मालिकेत लवकरच रेस सुरु होणार आहे आणि अंतरा देखील त्यामध्ये सहभागी होणार आहे. बघूया या रेसमध्ये ती जिंकू शकेल ? कि पिंट्याभाऊ आणि चित्राची खेळी सशस्वी ठरेल ?