
no images were found
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना करोनाची लागण, प्रकृती स्थिर असल्याची माहिती
नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला होता. काल दौरा अर्धवट सोडून त्यांनी तपासणी केली होती.
मिळालेल्या माहितीवरून काल छगन भुजबळ हे येवल्यात असताना त्यांची प्रकृती बिघडली. थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना डिस्जार्ज री सोडण्यात आले आहे. त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या छगन भुजबळ हे नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
“माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब करोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा”, असं ट्वीट करत त्यांनी माहिती दिली आहे.