no images were found
नितीन गडकरी यांना धमकी, पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी मंगळुरुत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या तरुणीचा मोबाईल नंबर देण्यात आला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणीचा मित्र बेळगाव तुरुगात कैदेत होता, अशी माहिती समोर आली आहे.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी मंगळुरुत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, काल गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला असून या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याने एका तरुणीचा मोबाईल नंबर कार्यालयात पैसे पोहोचते करण्यासाठी दिला होता. तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ज्या तरुणीचा मोबाईल नंबर देण्यात आला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जेलधूनच कॉल करण्यात आला असल्याचे स्पष्ट झालेय. जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी यांनीच फोन केल्याच प्रथमदर्शी दिसून येत आहे. एका तरुणी जी हॉस्पिटलमध्ये आहे तिच्याकडे विचारपूस सुरु आहे. स्थानिक पोलीस आणि सेंट्रल टीम गडकरी यांच्या सुरक्षेचा सातत्याने आढावा घेत आहे. लवकरच याची माहिती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी सांगितले की, गडकरी यांच्या कार्यालयात काल लागोपाठ तीन कॉल आले. 10:55 वाजता आलेल्या पहिल्या कॉलमध्ये बोलणे झाले नाही. मात्र 11 आणि 11:55 वाजता आलेल्या पुढील दोन कॉलमध्ये धमकी देणाऱ्याने जयेश पुजारी बोलत असल्याचे म्हटले आहे. त्याने दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसेच याची वाच्यता पोलिसांकडे करु नये, असा इशाराही दिला होता.
गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले होते. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी काल सांगितले होते की, गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करुन 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैशांच्या संभाषणासाठी जो नंबर देण्यात आला होता तो बंगळुरु येथील एका मुलीचा होता. त्या मुलीला याबाबत काहीच माहिती नव्हती, असेही पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, या तरुणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.