Home मनोरंजन कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव’

कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव’

10 second read
0
0
5

no images were found

कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव’ : २७ व २८ सप्टेंबर रोजी मराठी चित्रपटगीतांची सुरेल मैफल; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

कोल्हापूर,: मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध संगीत परंपरेचा आणि अविस्मरणीय चित्रपटगीतांचा रसिकांना अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. २७ सप्टेंबर आणि सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज परिसर, राजारामपुरी, कोल्हापूर येथे हा महोत्सव होणार आहे.

     दोन दिवसांच्या या महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध कालखंडातील लोकप्रिय आणि सदाबहार गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठी चित्रपटगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली भावविश्वे, संगीतपरंपरा आणि गीत-संगीताचा समृद्ध वारसा रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

     मराठी चित्रपटसंगीताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी गीते, त्यातील भावस्पर्शी आशय आणि संगीताची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटगीतांच्या समृद्ध वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

      हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच विविध कलाप्रकार आणि संगीतपरंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

     या महोत्सवातील दोन्ही दिवसांचे कार्यक्रम प्रवेश विनामूल्य असून कोल्हापूर व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘मराठी चित्रपटगीत महोत्सवा’चा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड : दानशूर व्यक्ती, सं…