no images were found
39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाई
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्र.क्र.20 मध्ये उपायुक्त परितोष कंकाळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी आज सकाळी 11.00 वाजता सर्व कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरीची तपासणी केली. या तपासणीमध्ये कर्तव्यावर गैरहजर असलेल्या तसेच गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने आज 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी रु.५००/- प्रमाणे तर एका मुकादमावर रु.2000/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २० मध्ये दैनंदिनपणे रस्ते सफाई करणे, कचरा उठाव करणे असे अंत्यत महत्वाचे स्वच्छतेचे कामकाज सोपविलेले आहे. तसेच कामावर असताना नियमितपणे गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर असून वरिष्ठांच्या न्याय व रास्त आज्ञेचे जाणीवपुर्वक व हेतुपरस्पर उल्लघंन केलेबाबतची कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आल्या आहेत.
शहरातील स्वच्छता राखणे हे महानगरपालिका प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्याचे काम आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे आवश्यक असून या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा कर्तव्यचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असे उप-आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक शिस्त व कार्यक्षमता आणण्यासाठी अशा प्रकारच्या आकस्मिक हजेरी तपासण्या यापुढेही नियमितपणे करण्यात येणार आहेत. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.