Home सामाजिक ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज — हिमांशू लेले

ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज — हिमांशू लेले

27 second read
0
0
13

no images were found

ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज — हिमांशू लेले : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ई -कचरा जनजागृती कार्यक्रम: ६५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर(प्रतिनिधी):-वाढत्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही आजची महत्त्वाची पर्यावरणीय गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ जनजागृती न करता प्रत्यक्ष कृतीत सहभागी व्हावे असे आवाहन पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशनचे संचालक हिमांशू लेले यांनी केले.

वाढत्या ई-कचऱ्याच्या समस्येबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना ई-कचरा संकलन व पुनर्वापराच्या प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे ई-कचरा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला, यावेळी केले बोलत होते.

या कार्यक्रमात अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेतील ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लेले यांनी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर तसेच ई-कचऱ्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले.सहायक प्राध्यापक अभिजीत पाटील यांनी प्रास्ताविकात ई-कचरा जनजागृती व संकलन मोहिमेची पार्श्वभूमी आणि उद्देश स्पष्ट केला.

       डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी सौरऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सोलर पॅनेल्समधून भविष्यात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. सोलर पॅनेल्स कालावधी संपल्यानंतर या कचऱ्याचे त्याच्या संकलन, पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाटीसाठी आतापासूनच नियोजन व तयारी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, त्यांनी ई-कचरा व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेल्या नियम व कायदेशीर तरतुदींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. ई-कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

      डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी ई-कचऱ्याच्या वाढत्या समस्येचा मानवी आरोग्य व समाजावर होणाऱ्या परिणामांबाबत मार्गदर्शन केले. ई-कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावल्यामुळे पर्यावरणीय प्रदूषणासोबतच मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा जबाबदारीने वापर, पुनर्वापर आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सवय समाजात रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

      कार्यक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘नेट झिरो पोर्टल’चे प्रमुख प्रा. अमित जाधव, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. वृशाली बाड आणि सचिव सौ. राधिका कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अमित जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

       यावेळी पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित ‘ई-वेस्ट रिसायकलिंग वॉरियर कॉन्टेस्ट-२०२६’ बाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कोल्हापूर शहर परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांसाठी स्पर्धा विनामूल्य आहे.

     स्पर्धेचे नोंदणीचे कालावधी २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर, तर ई-कचरा जनजागृती कार्यक्रम ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या व चौथ्या आठवड्यात घरगुती व संस्थात्मक ई-कचरा संकलन करण्यात येणार असून, नोव्हेंबरमध्ये पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकासाठी ११ हजार, द्वितीयसाठी ९ हजार तृतीय ७ हजार, चतुर्थ ५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ३ हजार अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

      या उपक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

गोकुळच्या निवडणुकीत भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

गोकुळच्या निवडणुकीत भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीमध्…