no images were found
आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफचा ९९.३१% चा दमदार क्लेम सेटलमेंट रेशो; क्षेत्रात आघाडीवर
मुंबई, : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी ९९.३१% चा क्लेम सेटलमेंट रेशो जाहीर केला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार (फॉर्म L-39 आणि L-40) भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांमध्ये हा रेशो सर्वाधिक आहे. या तिमाहीदरम्यान, कंपनीने ४१४.०८ कोटी रुपयांच्या वैयक्तिक मृत्यू दाव्यांचे निवारण केले. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत प्रमुख जीवन विमा कंपन्यांमध्ये कंपनीचे प्रति दावा सरासरी मूल्य सुमारे १५ लाख रुपये होते, जे सर्वात जास्त आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे चीफ – अंडररायटिंग अँड रिटेल क्लेम्स, श्री. सारंग गोखले म्हणाले: “आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफमध्ये, आम्ही आमचे ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबासाठी क्लेम प्रक्रिया सोपी, विनासायास आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत, आमचा क्लेम सेटलमेंट रेशो क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच ९९.३१% होता. तसेच, चौकशीची गरज नसलेल्या प्रकरणांमध्ये, अंतिम कागदपत्र मिळाल्यापासून क्लेम सेटल करण्याचा आमचा सरासरी वेळ (टर्नअराउंड टाइम) अवघा १ दिवस होता. याशिवाय, आम्ही मृत्यू दाव्यांपोटी ४१४.०८ कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे.
आमचा ‘ग्राहक-प्रथम‘ दृष्टिकोन आणि डिजिटलायझेशनवर असलेला विशेष भर आम्हाला क्लेम वेगाने सेटल करण्यास सक्षम करतो. यामुळे कुटुंबांना अशा वेळी वेळेत आर्थिक मदत मिळते, जेव्हा त्यांना तिची सर्वात जास्त गरज असते. क्लेम करणारे लोक आमच्या मोबाईल ॲप, व्हॉट्सॲप, चॅटबॉट आणि वेबसाईटच्या माध्यमातून सहजपणे क्लेम दाखल करू शकतात आणि तो ट्रॅकही करू शकतात.
आमच्या ‘क्लेम फॉर शुअर‘ या उपक्रमांतर्गत, आम्ही पात्र दाव्यांसाठी एका दिवसाच्या आत जवळपास ७५ कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. आम्ही आमच्या डिजिटल प्रक्रिया आणखी मजबूत करत आहोत, जेणेकरून कुटुंबांना अत्यंत गरजेच्या वेळी वेळेत आधार मिळू शकेल.”