Home Uncategorized स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वीपिंग मशीनद्वारे स्वच्छता

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वीपिंग मशीनद्वारे स्वच्छता

50 second read
0
0
5

no images were found

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वीपिंग मशीनद्वारे स्वच्छता : धूळकचरा  घाण संकलनासाठी यांत्रिक सफाई

कोल्हापूर, : ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता अधिक प्रभावीपणे व नियमितपणे करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत आज विविध प्रमुख मार्गांची स्वीपिंग मशीनद्वारे स्वच्छता करण्यात आली.

            शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता नियमितपणे होण्यासाठी विविध भागांची जबाबदारी संबंधित स्वीपिंग मशीन चालक व सर्व आरोग्य निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. यामध्ये आज संभाजीनगर पेट्रोल पंप ते कळंबा नाका साई मंदिर, दसरा चौक ते मिरजकर तिकटी रोड, केएसबीपी चौक ते शाहू टोल नाका, केएसबीपी चौक ते टेंबलाई उड्डाणपूल, राजारामपुरी परिसरातील प्रमुख रस्ते, टेंबलाई उड्डाणपूल ते कावळा नाका चौक, कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौक तसेच भगवा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप या प्रमुख मार्गांवर स्वीपिंग मशीनद्वारे स्वच्छता करण्यात आली.

            या यांत्रिक सफाईमुळे प्रमुख रस्त्यांवरील धूळ, कचरा व इतर घाण प्रभावीपणे संकलित होऊन रस्ते अधिक स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. संबंधित आरोग्य निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्वीपिंग मशीनचे नियमित निरीक्षण करून दैनंदिन कामकाजाची पाहणी करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत.

            दरम्यान इराणी खण येथेही महापालिका कर्मचाऱ्यांकडून पोकलँडच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली. यासोबतच घरगुती गणपती विर्सनाच्या अनुषंगाने अग्निशमन, विद्युत व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून संबंधित ठिकाणी स्वच्छता तसेच आवश्यक विद्युत व प्रकाश व्यवस्थेची कामे करण्यात येत आहेत.

            ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानाच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २…